लातूर- विहीर चोरीला गेली...हे एखाद्या चित्रपटात ऐकायला आणि पहायला बरे वाटते. मात्र, प्रत्यक्षात तसाच प्रकार रेणापूर तालुक्यातील सुमठाणा येथे घडला. गावची तहान भागवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विहिरीचे खोदकाम करावे, यासाठी मंजुरी मिळाली. सर्वकाही झाले ते फक्त कागदोपत्री. मात्र, ज्या ठिकाणी विहिरीसाठी जागा ठरवून देण्यात आली होती, त्याठिकाणी ना विहीर आहे ना, तशी कोणती प्रक्रिया झाली. त्यामुळे विहीर केवळ चित्रपटातच नाही, तर प्रत्यक्षातही चोरीला जाऊ शकते, हा प्रताप गावच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकाने दाखवून दिला.
सुमठाण्यात सरपंच, ग्रामसेवकाने केली विहिरीची चोरी; गावकऱ्यांना लावला ७ लाखाला 'चुना' - सरपंच, ग्रासेवकाने विहीर चोरली
सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मंजूरीही मिळाली. या विहिरीसाठी 7 लाखाचा निधीही ग्रामपंचायतीला मिळाला. त्यानुसार दोन महिन्यात विहिरीचे काम पूर्ण करायचे होते. सरपंच आणि ग्रामसेवकांनी अजब कारभार करुन विहिरीचे काम पूर्ण असल्याचे दाखविले आहे. कामाचे उद्घाटन झालेले नसतानाच मजुरांनी हे काम केल्याचे मस्टरवर दाखवण्यात आले. शिवाय हजेरीपत्रकावर मजुरांच्या तशा स्वाक्षऱ्याही आहेत. पण मजूर कधी कामावर आले नाहीत, तर विहिरीचे कामही झालेले नाही.
सुमठाणा गावच्या पाण्याची स्थिती पाहता विहीर बांधणीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मंजूरीही मिळाली. या विहिरीसाठी 7 लाखाचा निधीही ग्रामपंचायतीला मिळाला. त्यानुसार दोन महिन्यात विहिरीचे काम पूर्ण करायचे होते. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवकांनी अजब कारभार करुन विहिरीचे काम पूर्ण असल्याचे दाखविले आहे. कामाचे उद्घाटन झालेले नसतानाच मजुरांनी हे काम केल्याचे मस्टरवर दाखवण्यात आले. शिवाय हजेरीपत्रकावर मजुरांच्या तशा स्वाक्षऱ्याही आहेत. पण मजूर कधी कामावर आले नाहीत, तर विहिरीचे कामही झालेले नाही. 7 लाखाचा अपहार सरपंच आणि ग्रामसेवकाने केल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
सध्या कोरोनाच्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही. याच विहिरीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात जेसीबी आणले आहेत. हा सर्व दिखाऊपणा असला, तरी प्रत्यक्षात ना विहीर खोदलेली आहे, ना मजुरांच्या हाताला काम मिळाले. फक्त पैसा पडला आहे, तो सरपंच आणि ग्रामसेवकाच्या खिशात. असे असतानाही पाहणी न करताच बिल मंजूर झालेच कसे हा प्रश्न कायम आहे.