उदगीर (लातूर) -उदगीर शहरातील बिदर रोडवरील रघुकुल मंगल कार्यालया जवळील एका नालीमध्ये काल (दि.14) दुपारच्या सुमारास चक्क पाचशे रुपयांच्या अनेक नोटा वाहून जाताना आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी उदगीर शहर पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली असून याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नाही.
उदगीरमध्ये नालीत आढळल्या पाचशे रुपयांच्या अनेक नोटा - उदगीर लेटेस्ट न्यूज
उदगीर शहरातील बिदर रोडवर रघुकुल मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाजवळील नालीमध्ये 500 रुपयांच्या नोटा वाहून जात असल्याचे नागरिकांनी पाहिले. या नोटा खऱ्या असल्याचेही बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
उदगीर शहरातील बिदर रोडवर रघुकुल मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाजवळील नालीमध्ये 500 रुपयांच्या नोटा वाहून जात असल्याचे नागरिकांनी पाहिले. या नोटा खऱ्या असल्याचेही बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. या नोटांना वाळवी लागल्याने नोटा फाटलेल्या व छिद्रे पडलेली आहेत. शहरात जोरदार पाऊस झाल्याने नाले, गटारे तुडुंबभरुन वाहत होते. या नालीत अस्ताव्यस्त वाहत असलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा काही नागरिकांनी लंपास केले. या नोटा कुठून वाहून आले? नोटा कोणाच्या होते? याचा मात्र शोध अद्याप लागला नाही. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात हातावर पोट असणाऱ्या गरीब माणसाच्या घरात पाणी शिरून या नोटा पावसाच्या पाण्यात वाहून गेलेले असतील, अशी माहिती उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली आहे.