लातूर-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी तर सर्वाधिक 40 रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे 28 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 537 वर पोहोचली आहे. मात्र, सातत्याने वाढत असलेली रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील 220 व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 40 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये महानगरपालिका हद्दीत 5, लातूर तालुक्यात 11 तर औसा येथे 8 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर आतापर्यंत 25 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.