लातूर- फास्टफूडच्या जमान्यात नागरिकांना गावरान रानभाज्यांचा विसर पडत आहे. लोकांना रानभाज्यांचे प्रकार व त्यांच्या पौष्टिक गुणांची माहिती व्हावी यासाठी शहरातील औसा रोडजवळील कल्पतरू मंगल कार्यालयजवळ रानभाज्या आणि जंगली फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे रानभाज्या उद्योजकांना बाजारपेठ मिळाली असून जुन्या जिल्हाधिकारी परिसरात रोज रानभाज्यांची विक्री देखील केली जाणार आहे.
कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात 2 हजारहून अधिक शेती गट तयार करण्यात आले आहेत. रानभाज्या महोत्सवात ज्या गटांनी रासायनिक खतांच्या मदतीने उत्पादन घेतले, आशा ७० गटातील महिलांनी, तसेच जंगली फळ उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मांडण्यात आल्या आहेत. शहरातील लॉकडाऊन हटविल्यानंतर पहिल्याच दिवशी या मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे, लातूरकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला हजेरी लावली. शिवाय, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नागरिकांनी रानभाज्यांची खरेदीही केली.
जुन्या जिल्हाधिकारी परिसरात रानभाज्यांची दररोज होणार विक्री