लातूर -राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे बुधवारी दापका या गावाच्या विकासाबरोबरच अडचणी जाणून घेत होते. दरम्यान, दापक्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन योजनेची मागणी समोर येताच निलंगेकरांनी थेट पाणीपुरवठा मंत्र्याला फोन लावून योजना मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
गावातील पाणी योजनेकरता माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांचा थेट पाणीपुरवठा मंत्र्याला फोन - दापका ग्रामपंचायत लातूर बातमी
काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली निलंगा शहरालगची दापका ग्रामपंचायतीच्या चालू कामाबाबत काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉ. निलंगेकर यांनी दापका गावचे प्रमुख लाला पटेल यांना बोलावून आढावा घेतला. तेव्हा गावातील नवीन वस्तीसाठी पाण्याच्या सोय नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी थेट पाणीपुरवठा मंत्र्यांना फोन करून योजना मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली निलंगा शहरालगची दापका ग्रामपंचायतीच्या चालू कामाबाबत काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉ. निलंगेकर यांनी दापका गावचे प्रमुख लाला पटेल यांना बोलावून आढावा घेतला. तेव्हा गावातील नवीन वस्तीसाठी पाण्याच्या सोय नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डॉ निलंगेकर यांनी एका क्षणाचाही विलंब न करता थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना फोन करून दापका ग्रामपंचायतसाठी दोन पाण्याच्या टाक्या दोन विहिरी व पाईपलाईन योजना तत्काळ मंजूर करण्यात याव्यात अशा सुचना दिल्या. त्यावर मंत्र्यानी तत्काळ होकार देत विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले. योजना मंजूर होताच दर्जेदार काम करुन पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा सुचना शेवटी निलंगेकर यांनी लाला पटेल सरपंच प्रज्ञासागर वाघमारे यांना दिल्या.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते अनेक खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलेले डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा निलंगा मतदारसंघाच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. गेल्या ६० वर्षाच्या प्रदिर्घ राजकीय वाटचालीत कायम मतदारसंघाच्या लहान सहान विषयाकडे त्यांचे बारीक लक्ष असते. वयोमानानुसार मागच्या तीन चार वर्षांपासून डॉ. निलंगेकर सक्रिय राजकारणातून अलिप्त जरी असले तरी वेळ मिळेल तसा ते मतदारसंघात काय चालू आहे, कुठले विकासकामे सुरू आहेत, कोठे काय कमी आहे याची माहिती घेत असतात.