लातूर - कडब्याची एक पेंडी ३० रुपयाला मिळते. ओला चारा तर जिल्ह्यातून हद्दपार आहे. एवढेच नाहीतर जनावरांना देखील विकतचे पाणी पाजण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शेतकरी चारा छावण्यांची मागणी करत आहेत. मात्र, अधिकारी सांगतात की शेतकरी चारा छावण्यांची मागणी न करत रोख रक्कमेची मागणी करतात. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी प्रशासकीय भाषेत शेतकऱ्यांच्या मागणीला डावलून लावत आहेत.
शेतकऱ्यांची चारा छावणीची मागणी, अधिकारी म्हणतात शेतकऱ्यांची मागणीच नाही - latur
जिल्ह्यात सर्वत्र चाराटंचाई असताना चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. सध्या औसा, अहमदपूर, जळकोट येथून मागणी होत असताना देखील चालढकल केली जात आहे, तर नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनावरे विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
लातूर जिल्ह्यात पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईच्याही झळा जाणवू लागल्या आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा झाला. मात्र, पाण्याअभावी कडबा झाला नसल्याचे शेतकऱ्यांना सध्या चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ३२५ गाई, तर २ लाख ३२ हजार ५८४ म्हैस अशी एकूण ५ लाख ९३ हजार ९०९ जनावरे आहेत. गेल्या काही वर्षांपासून या जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाराटंचाई लक्षात घेता स्वतः जवळची जनावरे विकली, असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी भुपेंद्र बोधनकर म्हणाले.
जैन संघटनेने उभारलेल्या छावणीचा ६८२ जनावरे आधार घेत असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र चाराटंचाई असताना चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. सध्या औसा, अहमदपूर, जळकोट येथून मागणी होत असताना देखील चालढकल केली जात आहे, तर नैसर्गिक संकटाबरोबरच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनावरे विकण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेजारच्या बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो छावण्या सुरू आहेत. मात्र, लातूर जिल्ह्यात एकही छावणी सुरू नसल्याने शेतकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.