लातूर- जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातून जाणाऱ्या तेरू नदीला पूर आला आहे. त्यामुळे या परिसरातील २०० मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत. निवडणुकीसाठी कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पुरामुळे अडथळा निर्माण झाला.
लातूर : तेरू नदीला पूर; २०० मतदार मतदानापासून वंचित - Udgir Barahali road flood situation
जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे जळकोट तालुक्यातून जाणाऱ्या तेरू नदीला पूर आला आहे. त्यामुळे या परिसरातील २०० मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत.

आद्यपर्यंत गायब असलेला पाऊस रविवारी रात्री जिल्हाभर बरसला. त्यामुळे तेरू नदीला पूर आला व नदीचे पाणी पात्राबाहेर आले. त्यामुळे निवडणुकीसाठी कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अडथळा निर्माण झाला होता. आता पुरामुळे केंद्रापर्यंत कसे जावे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे. पुरामुळे अतनूर येथे पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे उदगीर-पिंपरी-नळगीर-घोणसी-अतनूर-बाराहळ्ळी मार्ग बंद झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसामुळे अतनूर परिसर व गावातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-बाभळगावत देशमुख कुटुंबीयांचे मतदान; रितेश-जेनेलिया ठरले आकर्षण