महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Five women drowned : हृदयद्रावक..! एकीला वाचवण्यासाठी गेल्या अन् पाचही जणी बुडाल्या

तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुणी पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी एकामागून एक चार जणी धावल्या. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने एकूण पाज जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदपूर तालुक्यातील पालम (जि. लातूर) येथे घडली आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली ( Five women drowned ) आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : May 14, 2022, 11:00 PM IST

लातूर- अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुळशीराम तांडा इथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मृत पाचही महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुणी पाय घसरून पाण्यात पडली आणि तिला वाचवण्यासाठी एकामागून एक धावलेल्या, अशा एकूण पाच जणी ( Five women drowned ) बुडाल्या. या महिलांसोबत असलेल्या 10 वर्षीय मुलाने आरडाओरड केल्याने हा प्रकार लक्षात आला.

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील उजना गावाजवळील तुळशीराम तांडा येथे ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्याची टोळी गेल्या पाच महिन्यांपासून मुक्कामी आहे. यात पालम तालुक्यातील मूळच्या मोजमाबाद तांडा आणि रामपूर तांडा येथील बंजारा समाजाच्या महिलाही आहेत. यातील पाच जणी कपडे धुण्यासाठी उजना गावाजवळील पाझर तलावात सकाळच्या सुमारास गेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक तरुणी पाय घसरून पाण्यात पडली. त्या तरुणीला वाचविण्यासाठी तिची आई आणि सोबत आलेल्या इतर महिलांनीही एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला. यापैकी कुणालाही पोहता येत नसल्याने एकामागून एक अशा पाचही जणी पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडाल्या.

याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास किनगाव पोलीस करत आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली आहे.

हेही वाचा -Truck Cruiser Accident : लातुरात क्रूझरची ट्रकला समोरासमोर धडक, ७ जण जागीच ठार, ११ गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details