महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात कचरा डेपोला आग, आगीवर नियत्रंण मिळवण्याचे काम सुरु - garbage

शहरातील आंबेडकर पार्कच्या बाजूला असलेल्या कचरा बुधवारी रात्री अचानक आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

लातुरात कचरा डेपोला आग

By

Published : Jun 6, 2019, 1:34 AM IST

लातूर - शहरातील आंबेडकर पार्कच्या बाजूला असलेल्या कचरा बुधवारी रात्री अचानक आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा घटनामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

लातुरात कचरा डेपोला आग

शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला हा कचरा डेपो उभारण्यात आला आहे. ८ दिवसांपूर्वीच कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती. रात्री पुन्हा आग लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कचरा डेपोची जागा महानगरपालिकेची आहे. मात्र, डेपोला लागूनच बँक असून या दोघांमध्ये या जागेवरून अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे. खरे कारण मात्र, तापस झाल्यावरच समोर येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details