महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, लातूरमध्ये एकावर गुन्हा दाखल - rumours on social media in Latur

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे एकाच दिवशी ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामध्ये जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या एकाचाही समावेश नाही. हे १२ जण दिल्ली मरकजहून आलेले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नेटकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहवयास मिळत आहे.

सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, लातूरमध्ये एकावर गुन्हा दाखल
सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, लातूरमध्ये एकावर गुन्हा दाखल

By

Published : Apr 6, 2020, 10:23 AM IST

लातूर - सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे सबंध देशात चिंतेचे वातावरण आहे. अशातच सोशल मीडीयावर आक्षपार्ह पोस्ट टाकल्याने समाजात तेढ निर्माण होत आहे. लातूरात अशाच प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एकावर शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेटकऱ्यांवर पोलीसांची करडी नजर राहणार आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे एकाच दिवशी ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामध्ये जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या एकाचाही समावेश नाही. हे १२ जण दिल्ली मरकजहून आलेले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नेटकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहवयास मिळत आहे.

अशाच प्रकारे मित्र नगरमधील वैभव वनारसे याने एक आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यामुळे समाजात चुकीची अफवा पसरली जात होती. त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंग्यात ८ कोरोनाग्रस्त आढळून आल्याने जातीय तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल केल्या जात आहे.

रविवारीच जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी याबाबत सुचना केल्या आहेत. अशाप्रकारे पोस्ट अपलोड केल्या तर गुन्हे दाखल करून कडक शासन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शहरातील शांततेबरोबर आता सोशल मीडीयावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांवरही पोलीसांना लक्ष द्यावे लागणार आहे.

सोशल मीडीयावर आक्षेपार्ह पोस्ट, लातूरमध्ये एकावर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details