लातूर : औसा-निलंगा रोडवरील वाघोली पाठीजवळ कार व ट्रकची समोरासमोर धडक (Car and Truck Accident in Latur) होऊन कार मधील बाप-लेकीचा (father daughter dies in horrific accident in Latur) जागीच मृत्यू (Hyderabad father daughter dies in Latur) झाला. या अपघातात चार अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Latest News from Latur)
Latur Accident : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकीचा मृत्यू, चार गंभीर - Latur Accident Breaking
औसा-निलंगा रोडवरील वाघोली पाठीजवळ कार व ट्रकची समोरासमोर धडक (Car and Truck Accident in Latur) होऊन कार मधील बाप-लेकीचा (father daughter dies in horrific accident in Latur) जागीच मृत्यू (Hyderabad father daughter dies in Latur) झाला. या अपघातात चार अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Latest News from Latur)
![Latur Accident : कार आणि ट्रकचा भीषण अपघात; बाप-लेकीचा मृत्यू, चार गंभीर Latur Accident Breaking](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16596563-thumbnail-3x2-caraccident.jpg)
ट्रक व कारची आमोरासमोर धडक-तुळजापूरहून देवदर्शन करून हैदराबादकडे निघालेल्या भाविकांची कार लातूकरकडे जाणाऱ्या ट्रकला समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला असून चार अन्य गंभीर प्रवासी जखमी झाले. पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हलविण्यात आले आहे. हैदराबाद येथील एक कुटुंब कारमधून शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेऊन तुळजापूरात आले होते. पहाटे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन हैदराबादकडे जात असताना औसा तालुक्यातील वाघोलीपाटी जवळ लातूरकडे जाणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारने समोरुन धडक मारली. अपघातातील मयत व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
जखमींवर लातूरमध्ये उपचार सुरू-या अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींना त्यांनी तात्काळ रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. जखमींवर लातूरात उपचार सुरु आहे.