लातूर- मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, घोषणांचा पाऊस न करता शेतकऱ्यांना पैशाविना शेती करण्याचा अजब सल्ला दिला गेल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळेच मोदी सरकार शेतकऱ्यांचे नसल्याची भावना बळराजा व्यक्त करत आहे.
पैशाविना शेती; बळीराजाची चेष्टा, अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया - union budget
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या जातील, असा आशावाद होता. परंतु, शेती व्यवसायात पैसा अधिक न गुंतवता उत्पादन अधिक काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या जातील, असा आशावाद होता. परंतु, शेती व्यवसायात पैसा अधिक न गुंतवता उत्पादन अधिक काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पैशाशिवाय शेती शक्यच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात उत्पादनापेक्षा अधिकचे पैसे शेतजमिनीत गाडावे लागत असून विना पैसे शेती हा सल्ला कसा दिला जात आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे पशुंचे खाद्य महागले असताना दुग्धव्यवसायाला चालना कशी द्यावी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. उत्पादनाला योग्य किंमत देण्याची घोषणा ही केवळ सभांमध्ये मर्यादित असून प्रत्यक्षात शेती उत्पादनाला कवडीमोल दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.