महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंब्याच्या बागांना धुक्याचा फटका, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी - हापूस आंबा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केशर आणि हापूस जातींच्या आंब्याची शेती केली जाते. जळकोट तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी २२ हेक्टरमध्ये केशर आंब्याची शेती केली. या परिसरात दुष्काळ असल्याने आंब्याच्या बागांमधून गेल्या ३ वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. या उलट विकतचे पाणी घेऊन बागा जगवाव्या लागल्याने मोठा खर्च झाला.

mango
आंब्याच्या बागांना धुक्याचा फटका

By

Published : Feb 1, 2020, 9:15 AM IST

लातूर- यावर्षी पाऊस चांगला झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दाट धुके पडल्याने या पिकांना फटका बसला आहे. बागेतील काही झाडांना तोर आला आहे, तर बहुतांश झाडे हे फुटवा करीत आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या हातावर तुरी.. हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केशर आणि हापूस जातींच्या आंब्याची शेती केली जाते. जळकोट तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी २२ हेक्टरमध्ये केशर आंब्याची शेती केली. या परिसरात दुष्काळ असल्याने आंब्याच्या बागांमधून गेल्या ३ वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही. या उलट विकतचे पाणी घेऊन बागा जगवाव्या लागल्याने मोठा खर्च झाला.

हेही वाचा - नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र

सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने यावर्षी तरी या पिकातून चांगले पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आता धुक्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याने ही आशाही धुसर झाली आहे. शेतकरी सुनील अव्वलवार यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details