लातूर -पाण्याच्या शोधात असलेले हरणाचे पाडस विहिरीत पडलेल्याची घटना औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गाव शिवारात घडली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या पाडसाला जीवदान मिळाले आहे.
शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान - farmer
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली या गावात पाण्याच्या शोधात हरणाचा एक कळप आला होता. दरम्यान, कळपातील एक पाडस शेतातल्या विहिरीत पडले होते. मात्र, विहीर खडकाळ आणि कोरडी ठाक असल्याने पाडसाला विहिरीच्या बाहेर येता आले नाही.
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली या गावात पाण्याच्या शोधात हरणाचा एक कळप आला होता. दरम्यान, कळपातील एक पाडस शेतातल्या विहिरीत पडले होते. मात्र, विहीर खडकाळ आणि कोरडी ठाक असल्याने पाडसाला विहिरीच्या बाहेर येता आले नाही. ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आपला जीव धोक्यात घालत दोरीच्या साहाय्याने पाडसाला बाहेर काढले.
सध्या लातूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने चारा आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांना वणवण भटकावे लागत आहे. विहरीतून बाहेर काढलेल्या हरणाच्या पाडसावर प्राथमिक उपचार करून पुन्हा वनक्षेत्रात सोडण्यात आले.