लातूर -दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यातच यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरिप हंगामच्या पेरण्या तर सोडाच शिवाय पीक विमा भरण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारनेच पीक विमा रक्कम भरावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज औसा येथे छावा संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.
लातूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. तर यंदाही पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी पीक विमा रक्कम भरू शकत नाहीत. त्यामुळे सरकारनेच शेतकऱ्यांचा पीक विमा भरावा. अशी मागणी छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केली.