लातूर- निसर्गाच्या संकटाशी शेतकऱ्यांचा सामना तर सुरूच आहे. पण कृषी विभागाचेही सहकार्य मिळत नसल्याने समस्यांमध्ये वाढ होत आहे. हरभरा पिकाची उत्पादकता कमी सांगितल्याने आता खरेदी केंद्रावर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
कृषी विभागाच्या आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका; खरेदी केंद्रावर अडचणी - शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अडचणी
निसर्गाच्या संकटाशी शेतकऱ्यांचा सामना तर सुरूच आहे. पण कृषी विभागाचेही सहकार्य मिळत नसल्याने समस्यांमध्ये वाढ होत आहे. हरभरा पिकाची उत्पादकता कमी सांगितल्याने आता खरेदी केंद्रावर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
हंगामाच्या सुरवातीला कृषी विभागाकडून नजर अंदाज पिकांची उत्पादकता घेतली जाते. गेल्या दोन वर्षांच्या सरासरीनुसार लातूर कृषी विभागाने उत्पादकता सादर केली. मात्र, यंदा हरभऱ्याचे उत्पन्न वाढले आहे. कृषी विभागाने हेक्टरी 6.5 क्विंटल उत्पादन होईल, असे कृषी विभागाला सांगितले होते. त्यानुसारच खरेदी केंद्रावर माल घेतला जातो. प्रत्यक्षात हेक्टरी 10.5 क्विंटलपर्यंत उत्पादन निघाले आहे. उत्पादन वाढले तरी खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याचा केवळ 6.5 क्विंटलच माल घेतला जात आहे. त्यामुळे हेक्टरी 4 क्विंटलचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. इतर ठिकाणी दर कमी आहेत तर खरेदी केंद्रावर अशी अडचण होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनाही निवेदन देण्यात आले आहे. शिवाय पालकमंत्री यांनाही शेतकऱ्यांची व्यथा सांगण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या सरासरीनुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिलेली नजर अंदाज उत्पादकता शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे.