महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीकविम्यावरून शेतकरी संतप्त ; रेणापूर तहसील कार्यालयात ठिय्या - रेणापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

पीक विम्याचा मोबदला मिळावा यासाठी कारेपूर मंडळातील शेतकऱ्यानी रेणापूर तहसील कार्यालयात ठीय्या आंदोलन केले. हा प्रश्न त्वरीत मार्गी लागला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्यानी दिला.

रेणापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

By

Published : Sep 21, 2019, 9:54 AM IST

लातूर -पीक विम्यावरून संबंध जिल्ह्यात गोंधळ निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनाकडून विमा बँक आणि कृषी विभागाला समोर केले जात आहे. विम्यापोटी रक्कम अदा करूनही त्या प्रमाणात मोबदला मिळाला नसल्याचे सांगत आज कारेपूर मंडळातील शेतकऱ्यांनी रेणापूर तहसील कार्यालयात ठिय्या दिला.

रेणापूर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या

लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाशी सामना करत आहेत. यातच गतवर्षीच्या खरिपाचा पीक विमा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या मंडळातील शेतकऱ्यांनी अधिकच्या क्षेत्रातील विमा काढूनही प्रत्यक्षात तो पदरी न पडल्याने आज मंडळातील सर्व गावचे शेतकरी तहसील कार्यालयात एकवटले होते. त्यामुळे कोणते निकष लावून विमा रक्कम लागू केली असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता.

गतवर्षी दुष्काळ जाहीर होऊनही अनुदान मिळालेले नाही. रब्बी पीक विमा भरलेल्या क्षेत्रात तफावत असून दुष्काळी मदतही त्वरित अदा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्वरित प्रश्न मार्गी न लागल्यास परिसरातील शेतकरी आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details