महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये आंदोलन - कृषी कायदे रद्द करण्याची मागणी लातूर

केंद्र सरकारकडून करण्यात आलेले नवे कृषी कायदे हे शेतकरी हिताचे नसून, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हेणार आहे. असा आरोप करत, लातूरमध्ये विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलनासाठी शेतकरी एकत्र आले होते. यावेळी जागर गोंधळ घालत आंदोलकांनी केंद्राच्या कृषी धोरणाचा विरोध केला.

Farmers' agitation latur
लातूरमध्ये सरकारविरोधात आंदोलन

By

Published : Dec 4, 2020, 4:43 AM IST

लातूर -केंद्र सरकारकडून करण्यात आलेले नवे कृषी कायदे हे शेतकरी हिताचे नसून, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हेणार आहे. असा आरोप करत, लातूरमध्ये विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलनासाठी शेतकरी एकत्र आले होते. यावेळी जागर गोंधळ घालत आंदोलकांनी केंद्राच्या कृषी धोरणाचा विरोध केला.

लातूरमध्ये सरकारविरोधात आंदोलन

सरकारकडून कामगार आणि शेतकऱ्यांसाठी नवे कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यांमुळे कामगार व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून, हे कायदे तातडीने रद्द करावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत महात्मा गांधी चौकात जागरण गोंधळ घातल कृषी कायद्यांना विरोध केला. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे कायदे तयार केले आहेत. म्हणूनच या कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याची माहिती यावेळी या आंदोलकांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details