लातूर -डोक्यावर असलेले कर्ज आणि नापिकीला कंटाळून औसा तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मधुकर श्रीरंग पवार (वय-50, रा. अंदोरा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
मधुकर पवार यांच्या मालकीची साडेतीन एकर जमीन आहे. त्यांच्यावर बँकेचे अंदाजित एक लाखाचे कर्ज होते. मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतीतील पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतात असलेले संपूर्ण पीक अजूनही पाण्यात असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे? या चिंतेत ते होते.