लातूर- शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील तरूण शेतकरी मारोती रावसाहेब बिरादार (वय ३० वर्षे) या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
कर्जबाजारीपणाला कंटाळून लातुरात शेतकऱ्याची आत्महत्या - शिरुर अनंतपाळ
कर्जबाजारीपणाला आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून डिगोळ (ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) येथील मारोती बिरादार या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
![कर्जबाजारीपणाला कंटाळून लातुरात शेतकऱ्याची आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4947856-940-4947856-1572779413260.jpg)
मारोती बिरादार यांनी तीन वर्षापूर्वी आयसीआयसीआय. बँकेकडून 6 लाख रूपये व लातूर जिल्हा मध्यवर्तीकडून 1 लाख 25 हजार रूपये कर्ज आपल्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नासाठी काढले होते. परंतु, निसर्गाचा लहरीपणा सततची नापिकी त्यातच बँकेचा तगादा, वयोवृध्द आई, वडील त्यांच्या औषधोपचाराचा खर्च या सर्व गोष्टीला वैतागून या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा घरातील लोकांनी शोध घेतला. परंतु, शोध लागला नाही मात्र गावा शेजारच्या एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे अढळले. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात शेवविच्छेदन करून कुटुंबीयाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मृत शेतकरी बिरादार यांच्यावर डिगोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.