लातूर-सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औसा तालुक्यात रविवारी घडली आहे. महादेव पांडुरंग माळी वय 37 वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव आहे. माळी यांनी विषारी औषध पिऊन आपले जीवन संपवले.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Latur Latest News
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना औसा तालुक्यात रविवारी घडली आहे. महादेव पांडुरंग माळी वय 37 वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव आहे. माळी यांनी विषारी औषध पिऊन आपले जीवन संपवले.
उपचारादरम्यान मृत्यू
महादेव माळी यांच्या मालकीची पाच एकर जमीन आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळामुळे कर्ज वाढत गेल्याने माळी यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यांनी विषारी औषध घेतल्याचे लक्षात येताच त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व आई असा परिवार आहे. दरम्यान कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढत असून, गेल्या आठवड्यातच एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आज पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.