लातूर -सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा डोंगर यामुळे मनोबल खचलेल्या शेतकऱ्यांने विष घेऊन आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील कवठाळा गावात ही घटना घडली. अशोक रामचंद्र हुडे (वय ४८) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
अशोक हुडे यांना पाच एकर शेती आहे. हुडे यांच्यावर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अलाहाबाद बँकेचे कर्ज होते. मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेतून हुडे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.