लातूर - अहमदपूर तालुक्यातील सोनखेडमध्ये एका शेतकऱ्याने बायकोच्या साडीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बायकोच्या साडीनेच शेतकऱ्याने घेतला गळफास; अहमदपूर तालुक्यातील घटना - farmers suicide news
सोनखेडमध्ये एका शेतकऱ्याने बायकोच्या साडीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
![बायकोच्या साडीनेच शेतकऱ्याने घेतला गळफास; अहमदपूर तालुक्यातील घटना farmers suicide in latur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6072713-thumbnail-3x2-suicide.jpg)
जगन्नाथ पंढरीनाथ भोसले (वय-45) यांनी स्वतःच्या शेतामधील झाडाला गळफास घेतला. सोनखेड शिवारात त्यांची पाच एकर जमीन होती. मात्र, कौटुंबिक तणावातून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच किनगाव पोलीस ठाण्याचे चंदू गोखरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वढत आहे. मागील आठवड्यात तब्बल सहा जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.