लातूर -जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रोकडा सावरगावात शेतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये फळपिकांसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
रोकडा सावरगाव येथील उमाकांत संतराम बेल्लाळे यांच्या शेतात अचानक आग लागली होती. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बेल्लाळे यांच्या शेतीमधील ऊस, हळद, आंबा आदी फळझाडे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच ठिबक साहित्य व स्प्रिंकलर साहित्य जळून राख झाले आहे.