महाराष्ट्र

maharashtra

खेड्याकडे नाही शहराकडे चला, कामाच्या शोधात ग्रामस्थांचे स्थलांतर

By

Published : Jul 29, 2019, 6:30 PM IST

निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच जिल्ह्यातील ग्रामस्थ घराला टाळे ठोकून कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.

लातूरमधील दुष्काळी परिस्थिती

लातूर- दुष्काळाच्या दाहकतेचा परिणाम आता बळीराजा बरोबरच शेत मजुरांवरही जाणवू लागला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच ग्रामस्थ घराला टाळे ठोकून कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. तालुक्यातील रायवाडी येथील शेतकऱ्याने आठवाड्याभरपूर्वीच नापीकी आणि कर्जाचा भार याला त्रासून आत्महत्या केली तर दोन दिवसानंतर याच गावच्या सुरेश रावसाहेब निकम यांनी कामाच्या शोधात पुणे गाठले आहे.

लातूर जिल्ह्यातील ग्रामस्थ घराला टाळे ठोकून कामाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत.

खेड्याकडे चला हा संदेश महात्मा गांधी यांनी दिला असला तरी दुष्काळाने ओढवलेल्या परिस्थीतीने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. हाताला कामच नसल्याने जगायचे कसे असा सवाल उपस्थित होऊ लागला. जुलै महिन्याच्या अखेरही खरीपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. दुष्काळामुळे शहर हाकेच्या अंतरावर असताना हाताला काम नाही. त्यामुळे आत्महत्या सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

22 जुलै रोजी तालुक्यातील रायवाडी येथील शेतकरी शिवाजी पवार यांनी आत्महत्या केल्यानंतर या गावचे वातावरणच बदलले आहे. मुलांची शिक्षण आणि संसाराचा गाढा चालविणे जिकिरीचे होत असल्याने ग्रामस्थ शहराकडे स्थलांतरीत होत आहेत. पैकी सुरेश निकम हे एक असून त्यांनी पुण्यातील कंपनीत 8 हजार महिन्यावर काम सुरू केले आहे. दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहवयास मिळत आहे.

सण 2016-19 या कालावधीत 48 हजार तरुणांनी बेरोजगारीच्या यादीत नाव नोंदणी केली आहे तर केवळ 10 हजार जणांच्या हातालाच काम मिळाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांचा अधिक सहभाग असल्याचे समोर आले आहे. दुष्काळमुळे शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. मजुरांच्या हाताला काम कसे मिळणार हा सवाल आहे. यंदा तर भर पावसाळ्यात ग्रामस्थांचे स्थलांतर होऊ लागले आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस आणि उद्योग निर्माण झाल्याशिवाय खेड्याकडे चला या संदेश प्रत्यक्षात उतरला जाणार नसल्याचे चित्र आहे

ABOUT THE AUTHOR

...view details