महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरमध्ये बलात्काराच्या घटनेने खळबळ; जुळे असल्याचा फायदा घेऊन दीराने 6 महिने केला अत्याचार - तब्बल सहा महिने केला अत्याचार

लातूरमध्ये नवऱ्याचा जुळ्या भावानेच भावजयीवर केला बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. ( Rape of one's own nephew ) नवऱ्यासारखे दिसण्यात साम्य असल्याचा फायदा घेऊन दीराने भावजयीवर 6 महिने लैंगिक अत्याचार ( Rape taking advantage of being twins ) केला. पीडितेला याबद्दल 6 महिन्यानंतर कळाल्यावर नवरा, सासू-सासऱ्यांना याबाबत कल्पना दिली. गंभीर बाब म्हणजे त्यांनी हे प्रकरण असेच चालू ठेवण्यास सांगितले.

Latur Police Station
लातूर पोलिस स्टेशन

By

Published : May 20, 2022, 1:28 PM IST

लातूर :एकाच कुटुंबातील दोन जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा फायदा घेत सहा महिन्यांपूर्वी नवीन लग्न होऊन घरी आलेल्या भावाच्या बायकोवर दोघांनीही लैंगिक अत्याचार ( Both sexually abused for six months ) केल्याची निंदनीय बाब लातूरमध्ये समोर आली आहे. लातूर शहरातील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे मागील सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्न झालेल्या तरुणाला दुसरा एक जुळा भाऊ आहे. त्या दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे घरात आलेल्या 20 वर्षीय नववधुला आपला नवरा व नवऱ्याचा भाऊ यातील फरक समजला नाही. त्यामुळे गैरफायदा घेत दीराने व नवऱ्याने तिचे लैंगिक शोषण ( Sexual abuse ) केले. हा प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर विवाहितेच्या लक्षात आला ( Six months later the married woman was noticed) आहे.

सदर घटनेला नवरा, सासू-सासरेंचे पाठबळ : सदरील प्रकार विवाहितेच्या लक्षात येताच तिने आपल्या पतीला याची कल्पना दिली. परंतु, त्याने जे सुरू आहे ते सुरू राहू दे, असा सल्ला दिला आणि पुढेही हा अत्याचार सुरूच ठेवला. नवरा ऐकत नाही म्हटल्यावर विवाहितेने हा प्रकार सासू-सासऱ्यांना सांगितला. परंतु, त्यांनीही हे असेच चालणार आहे तुला नांदायचे आहे की नाही, असे म्हणत तिला भीती घातली. काही दिवसांनंतर सदर विवाहिता माहेरी गेली. तिला बोलावण्यासाठी तिचा दीर (जुळा) तिच्याकडे माहेरी गेला. यावेळी तिने सासरी येण्यास नकार दिला. माहेरच्या लोकांनी तिला सासरी न जाण्याचे कारण विचारल्यानंतर तिने सासरी सुरू असलेला हा प्रकार सांगितला.


पोलिसांत घेतली धाव : ही गंभीर बाब विवाहितेच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लातूर शहरातील शिवाजीनगर पोलिसांत गु.र.नं. 228/22 कलम 376, 323, 506, 24 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही जुळ्या भावांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलकांते करीत आहेत. अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप डोलारे यांनी 'ई-टीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.

हेही वाचा : Rape On Minor Girl Jalgaon : वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details