महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात रेणुकासह दोन बहिणींच्या शिक्षणाचा मार्ग सुखकर; एकनाथ शिंदेंनी घेतली जबाबदारी - मंत्री एकनाथ शिंदे सामाजिक बांधिलकी

जळकोट तालुक्यातील होकारणा येथे रेणुका व तिच्या बहिणी वास्तव्यास आहेत. दहावी निकालाच्या पूर्वसंध्येला रेणुकाच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शिक्षण घेणे शक्य नव्हते, पण अनेकांनी मदत केल्याने या तिन्ही बहिणी शिक्षण घेऊ लागल्या आहेत. शिवाय तिच्या दोन बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

eknath shinde took responsibility of three orphan girls education from latur
रेणुका गुंडरे

By

Published : Nov 9, 2020, 2:54 PM IST

लातूर - जळकोट तालुक्यातील होकारणा येथील रेणुका गुंडरे या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीत 93.20 टक्के गुण मिळवले होते. मात्र, तिच्या यशाला दुःखाची किनार होती. दहावी निकालाच्या पूर्वसंध्येलाच रेणुकाच्या आईचे निधन झाले होते, शिवाय ती लहान असताना वडिलांचाहीमृत्यू झाला होता. हुशार असूनही आता दोन्ही बहिणींचा सांभाळ कसा करावा आणि शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न तिच्यासमोर होता. मात्र, समाजातून मदतीचे असंख्यहात पुढे आले, त्यामुळे रेणुकाचे तर शिक्षण सुरू आहेच. शिवाय तिच्या दोन बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

लातुरात रेणुका गुंडरेच्या दोन बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी घेतली.

हेही वाचा -गुजरातच्या निलांशीच्या नावावर लांब केसांचे वर्ल्ड रेकॉर्ड; सलग तीनवेळा मिळवला मान

दानशूर सरसावले

होकारणा येथील रेणुकाचा शैक्षणिक प्रवास इतरांना प्रेरणा देणारा आहे. इयत्ता पहिलीत असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईला शेतीकामात मदत करीत रेणुकाने दोन बहिणींचा सांभाळ तर, केलाच शिवाय शैक्षणिक गुणवत्ता कधी कमी होऊ दिली नाही. इयत्ता दहावीच्या निकालाच्या पूर्वसंध्येला शेतामध्ये काम करीत असताना रेणुकाच्या आईला सापाने चावा घेतला आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता. परीक्षेत मिळालेले घवघवीत यश सांगावे तरी कोणाला, हा प्रश्न रेणुका समोर होता. हुशार असूनही पुढचे शिक्षण घेणे शक्य नाही, अशी स्थिती ओढावली होती. शिवाय दोन बहिणींची जबाबदारी होतीच. परंतु, समाजातील अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला. अवघ्या काही दिवसांमध्येच रेणुकाच्या खात्यामध्ये लाखोंचा निधी जमा झाला होता. त्यामुळे तिचे शिक्षण सुरू झाले होते.

रक्कम दिली घरपोच

परंतु, दोन बहिणींच्या शिक्षणाचा मार्ग खडतर असताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लाखाची मदत दिली; शिवाय शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे. त्यामुळे गुणवत्ता असतानाही केवळ परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या तिन्ही बहिणी शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी तसेच पदाधिकारी यांनी तिच्या घरी जाऊन मदतीची रक्कम व मंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र वाचून दाखविले.

रेणुकानेही मानले आभार
अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये समाजातील दानशूर व्यक्तींनी रेणूकाला आर्थिक मदत केली आहे. यापूर्वी तिच्या बँकेच्या खात्यामध्ये 5 लाखांहून अधिक रक्कम झाली होती. तर आता बहिणींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तिने मंत्री एकनाथ शिंदे आणि ज्यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -चिमण्यांसाठी जीवन समर्पित करणारा अवलिया!

ABOUT THE AUTHOR

...view details