लातूर - आषाढी एकादशी निमित्त लातूर शहरासह जिल्ह्यात विठुरायाचा दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. शिवाय शहरात विविध शाळांतर्फे विद्यार्थ्यांना घेऊन काढलेल्या दिंड्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विठ्ठल नामाचा जयघोष करीत सर्व दिंड्या या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विसावल्या. शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान कीर्तन, प्रवचन करीत विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
विठुनामाचा जयघोष करीत बालकांच्या दिंड्यानी वेधले लातूरकरांचे लक्ष - विठु नामाचा जयघोष
आषाढी एकादशी निमित्त विविध शाळांतर्फे विद्यार्थ्यांना संतांच्या वेशभुषेत तयार करून शहरातून काढण्यात आलेल्या दिंड्यानी लातूरकरांचे लक्ष वेधले. यावेळी शहरातून मार्गस्थ होत असताना जागोजागी नागरिकांनी मोठ्या उत्साहात या बाल विठ्ठल-रुक्मिणीचे स्वागत केले.
आषाढी एकादशी निमित्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तत्पूर्वी शहरातून बाल विठ्ठल-रुक्मिणीचे रूप धारण करून वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. शुक्रवारी सकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून विविध शाळांनी विद्यार्थ्यांना घेऊन विठु नामाचा जयघोष करीत मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनाही विविध संतांच्या वेशभुषेत तयार करण्यात आले होते. शहरातून मार्गस्थ होत असताना जागोजागी नागरिकांनी मोठ्या उत्साहात या बाल विठ्ठल-रुक्मिणीचे स्वागत केले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सर्व भाविक भक्त दाखल होताच विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरवात झाली. गेल्या 7 वर्षापासूनची ही परंपरा लातूरकारांनी यंदाही जपली आहे.
बालगोपालांचा मेळा आणि त्यात धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.