महाराष्ट्र

maharashtra

अंडी व पोल्ट्री मांस खाणे सुरक्षीत, पशुसंवर्धन विभागाची माहिती

By

Published : Jan 12, 2021, 8:18 PM IST

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू, अंडी आणि कुक्कूट मांस हे 70 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

अंडी व पोल्ट्री मांस खाणे सुरक्षीत
अंडी व पोल्ट्री मांस खाणे सुरक्षीत

लातूर-बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू, अंडी आणि कुक्कूट मांस हे 70 अंश सेल्सिअस तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने, अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षीत आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कुक्कुट वर्गीय पक्ष्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात 200, अमरावती जिल्ह्यात 11 व अकोला जिल्ह्यात 3 अशा 214 पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत पक्ष्यांचे नमुने हे तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल येण्यासाठी 48 ते 72 तासांचा कालावधी लागू शकतो. तर दिनांक 8 जानेवारी पासून ते आतापर्यंत एकूण 1 हजार 839 पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पूर्वी पाठवलेल्या नमुन्यांच्या तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथून नुकतेच प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच परभणी जिल्हयातील मुरुंबा या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅथोजेनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच 5एन 1 या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील नमूने (एच 5एन 8 या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आलेले आहेत.

लातूर येथील नमुने ही सकारात्मक

लातूर येथील नमुनेही सकारात्मक आल्यामुळे या क्षेत्राला "संसर्गग्रस्त क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, त्या पोल्ट्री फार्मपासून 1 किलोमीटर परिसरातील सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात येणार आहे. तर मुंबई, ठाणे, दापोली आणि बीडमध्ये केवळ सर्वेक्षण सुरू ठेवण्यात येणार आहे.

अंडी व पोल्ट्री मांस खाणे सुरक्षीत

पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास पशुवैद्यकीय रुग्णालयांना माहिती द्या

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास, तसेच पोल्ट्रीफार्ममध्ये नेहमीपेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास, तातडीने त्याची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दुरध्वनी क्रमांक 18002330418 वर संपर्क साधून याची माहिती द्यावी असे आवाहन देखील यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. तसेच मृत पक्ष्यांना हात लावू नका, पक्ष्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती तातडीने संबंधित यंत्रणेला द्या असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details