महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयोध्या निकाल प्रकरणी लातुरात बंदोबस्त तैनात;बाजारपेठात शुकशुकाट - लातूर लेटेस्ट न्यूज

आज आयोध्येतील राम जन्मभूमी -बाबरी मस्जिद प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्या अनुषंगाने लातूर शहरासह जिल्ह्यात मोठा पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आयोध्या निकाल प्रकरणी लातुरात बंदोबस्त

By

Published : Nov 9, 2019, 10:06 AM IST

लातूर -आज आयोध्येतील राम जन्मभूमी - बाबारी मस्जिद या जागा प्रकरणाचा प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्याअनुषंगाने लातूर शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सकाळच्या दरम्यान मुख्य बाजारपेठांमध्ये कमालीची शांतता पहावयास मिळाली. लातूर शहरासह उदगीर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले आहे.

आयोध्या निकाल प्रकरणी लातुरात बंदोबस्त

सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक यासारख्या माध्यमांवर पोलीसांची करडी नजर राहणार आहे. शिवाय समाजिक संघटना आणि नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या असून शांतातेबाबत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सूचना केल्या आहेत. निकालादरम्यान आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडयावर व्हायरल केल्यास दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. विशेषतः लातूर शहर आणि उदगीर या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निकालाच्या आगोदर दोन दिवस व नंतर दोन दिवस हा बंदोबस्त तैनात राहणार आहे. यापुर्वी १९९२ आणि २०११ मध्ये उदगीरमध्ये तणाव निर्माण झाला होता. लातूरकरांनी आतापर्यंत सर्व उत्सव, सामाजिक उपक्रम तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्या आहेत. त्यामुळे यावेळी लातूरकर आपला शांततेचा आदर्श कायम ठेवतील असा आशावाद जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details