लातूर - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासन कठोर पाऊल उचलत असतानाही नियमांची पायमल्ली करणाऱ्या २७ व्यक्तींना रेणापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्याहून हे सर्वजण एका टेम्पोत नांदेड जिल्ह्यातील मुखेड लगतच्या गावात निघाले होते.
टॅम्पोत गावाकडे निघालेल्या मजुरांना रेणापूर पोलिसांनी पकडले - latur corona
राज्यात जिल्हाबंदी आदेश लागू आहे. मात्र, शहरात हाताला काम नाही नसल्यामुळे नागरिक गाव जवळ करीत आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेणापूर पोलिसांनी रेणापुर फाट्याजवळ दोन टेम्पोत पकडले.
राज्यात जिल्हाबंदी आदेश लागू आहे. मात्र, शहरात हाताला काम नाही नसल्यामुळे नागरिक गाव जवळ करीत आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेणापूर पोलिसानी रेणापुर फाट्याजवळ दोन टेम्पोत पकडले. यामध्ये २७ व्यक्ती पुण्याहून मुखेडला प्रवास करत होते. पुणे-बार्शी-मुरुड रेणापूर मार्गे प्रवास करताना रेणापूर पोलिसानी अटक केली आहे. यामध्ये १३ पुरुष ७ महिला तर ७ लहान मुले आहेत.
सर्व प्रवाशी हे पुणे इथ बिगारी मजुरी काम करत असून, कोरोनाच्या धास्तीने गावाकडे जात असताना रेणापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यात पुर्णपणे लॉकडाऊन असताना जिल्ह्यात नागरिक प्रवेश कसा करतात हाच मोठा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसानी सांगितले आहे.