लातूर - जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, परतीच्या पावसाने दिलासा दिला असला तरी काही मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे गाधवडमध्ये शेतजमीनच वाहून गेल्याने कोथंबीरचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
लातुर : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान
पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात ३७ टँकर आणि अनेक जलस्रोतांचे अधिग्रहण सुरूच होते. चार महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ६० टक्के पाऊस झाला होता. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून जिल्हयात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
हेही वाचा -देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात 37 टँकर आणि अनेक जलस्रोतांचे अधिग्रहण सुरूच होते. चार महिन्याच्या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ 60 टक्के पाऊस झाला होता. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून जिल्हयात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. लातूर तालुक्यातील गाधवड मंडळ तसेच अहमदपूर तालुक्यातील खंडाळी, किनगाव, अंधोरी, हाडोळती महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गाधवड येथील गिराबाई रामप्रसाद कदम, भागवत कदम, तुकाराम कदम, वसंत कदम यांच्या शेतातील कोथंबीरीचे तब्बल 5 लाखाचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी केली आहे.