लातूर -आतापर्यंत ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कोरोना रुग्णांचा अहवाल दिला जात होता त्याच रुग्णालयात आता लसीकरणाची तयारी केली जात आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी सकाळी 10 वाजता नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ड्राय रन करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. सीईओ अभिनव गोयल, अधिष्ठाता लक्ष्मण देशमुख, वैद्यकीय अधिकारी सुनील डोपे यांची उपस्थिती होती.
कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरवात ;पहिल्या टप्प्यात 17 हजार 500 जणांची नोंदणी - latur corona news
आतापर्यंत ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कोरोना रुग्णांचा अहवाल दिला जात होता त्याच रुग्णालयात आता लसीकरणाची तयारी केली जात आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी सकाळी 10 वाजता नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ड्राय रन करण्यात आला आहे.
लसीकरणाबाबत मार्गदर्शन
लसीकरण कक्षात आल्यापासून घ्यावयाची काळजी तसेच लसीकरण केल्यानंतर संबंधित व्यक्तीने कोणत्या गोष्टींचे पालन करावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात 15 जणांना याची माहिती दिली. शिवाय जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. यांनी लसीकरणाची पद्धत कशी राहणार, तांत्रिक अडचणी काय येऊ शकतात याबद्दल माहिती घेतली. नाव नोंदणीसह लसीकरण झाल्यावर संबंधित व्यक्तीला तास रुग्णालयातच थांबावे लागणार आहे.
जिल्ह्यात या पाच ठिकाणी ड्राय रन
लातूर जिल्ह्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, उपजिल्हा रुग्णालय उदगीर, प्राथमिक आरोग्य केंद्र भातागळी, ग्रामीण रुग्णालय मुरुड व शहरी आरोग्य केंद्र मंठाळे नगर ही पाच ठिकाण निश्चित केली. या पाच केंद्रावर नोंदणी केलेल्या आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी 25 लोकांना बोलावून घेऊन लसीकरणाच्या अनुषंगाने रंगीत तालीम केली जात आहे.
हेही वाचा -पॉर्न फिल्म बघून शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू