महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'रडतेस का?' म्हणून निर्दयी बापानेच पोटच्या मुलीचा आवळला गळा - बापानेच पोटच्या मुलीला मारले

'रडतेस का?' म्हणून बापानेच पोटच्या एक वर्षीय मुलीला गळा आवळून मारल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील निटूर येथे घडली आहे. शिवाजी लाळे असे आरोपीचे नाव आहे. शिवाजी याचे मुक्ताबरोबरचे दुसरे लग्न आहे. पहिल्या पत्नीनेही त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

निर्दयी बापाने पोटच्या मुलीचा आवळला गळा

By

Published : Aug 2, 2019, 10:59 PM IST

लातूर - 'रडतेस का?' म्हणून बापानेच पोटच्या एक वर्षीय मुलीला गळा आवळून मारल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील निटूर येथे घडली आहे. शिवाजी लाळे असे आरोपीचे नाव आहे. मुलगी झोपत नसल्याने व्यसनाच्या आहारी गेलेल्या निर्दयी बापाने केलेले हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. या घटनेबाबत परीसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शिवाजी लाळे हा गुरुवारी सायंकाळीही दारू पिऊनच घरी आला होता. दरम्यान, त्याची १ वर्षाची मुलगी श्रावणी रडत होती. तर, तिची आई मुक्ता ही तिची समजूत काढत होती. शिवाजी तिला झोपवतो म्हणून दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. त्यांनंतर मुलीचा आवाजच येत नसल्याने आईने जाऊन पहिले तर श्रावणी ही शांत पडून होती. त्यामुळे आई मुक्ता यांनी श्रावणीला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी श्रावणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

आरोपी शिवाजीचे मुक्ताबरोबरचे दुसरे लग्न आहे. पहिल्या पत्नीनेही त्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर जेलची हवा खाऊन परतल्यानंतर त्याने मुक्ताशी २ वर्षांपूर्वी विवाह केला होता. मात्र, त्यानंतरही त्याने दारूच्या आहारी जाऊन पोटच्या मुलीचा गळा आवळला. यासंबंधी आईच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात शिवाजीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details