महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातुरात पाणीबाणी : रेल्वेसह सर्व पर्यायांची जिल्हा प्रशासनाकडून चाचपणी - लातूरात पाण्याचे नियोजन

दिवसेंदिवस मांजरा धरणाची घटती पाणीपातळी लातूरकरांच्या चिंतेत भर टाकत आहे. पाण्याचे नियोजन आणि भविष्यातील टंचाई निवारण्यासाठी सप्टेंबरपासून शहराला महिन्यातून केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होणार आहे.

लातुरात पाणीबाणी; रेल्वेसह सर्व पर्यायांची जिल्हाप्रशासनाकडून चाचपणी

By

Published : Aug 20, 2019, 9:23 AM IST

Updated : Aug 20, 2019, 2:56 PM IST

लातूर -शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण मृतसाठ्यात आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि भविष्यातील टंचाई निवारण्यासाठी सप्टेंबरपासून शहरात महिन्यातून केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होणार आहे. वॉटर ट्रेनसह सर्व पर्यायांची चाचपणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीत केली आहे.

लातूरात पाणीबाणी : रेल्वेसह सर्व पर्यायांची जिल्हा प्रशासनाकडून चाचपणी

जानेवारी महिन्यापासून शहराला 10 दिवसाला पाणीपुरवठा केला जात होता. त्यानुसार योग्य नियोजन होईल आणि पावसाळ्यानंतर लातूरकरांना पाणीटंचाई भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, पावसाने अवकृपा दाखवल्याने भर पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. सरासरीच्या तुलनेत केवळ 31 टक्के पाऊस झाला असून सध्या उन्हाळ्याची अनुभवी लातूरकर घेत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बैठकावर बैठका घेऊन पाण्याच्या नियोजना बाबतचे सर्व पर्याय समोर केले आहेत. याकरिता कर्मचाऱ्यांच्या सुट्या देखील रद्द केल्या आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत मांजरा धरणातील पाणी आणि शहराला लागणारे पाणी याचा आढावा घेऊन महिन्यातून दोनदा पाणी देण्याचे धोरण स्विकारले जाईल असे सांगण्यात आले आहे.

बैठकीत काय झाले नियोजन..!

मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध् असून महापालिकेला देण्यात येणाऱ्या पाण्यात 15 टक्के कपात करुन ही कपात 50 टक्के करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने लातूर शहराला सप्टेंबर 2019 पासून महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा करावा. तसेच पुढील काळात पाऊस झाला नाही व धरणात पाणी उपलब्ध झाले नाही तर महापालिकेच्या पाणी पुरवठयात आणखी कपात करण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे.

काय आहेत पर्याय...?

लातूर शहराला पाणी पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी वॉटर ट्रेन, उस्मानाबाद येथून उजणीचे टँकरने पाणी आणणे, व इतर सर्व पर्यायी पाणी पुरवठयाची व्यवस्था व नियोजन महापालिका व संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी करावे. महापालिका , महावितरण, पाणी पुरवठा विभाग यांनी रेल्वे ट्रेनसाठी जागेवर जाऊन पाहणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. मांजरा धरणात पाणी नसल्याने लातूरला भविष्यात पाणीपुरवठा करत यावा, या करिता सर्व नगर पालिकांच्या पाणी पुरवठयामध्ये 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

Last Updated : Aug 20, 2019, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details