महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळकोटच्या सुमितचे 'नीट पीजी' परीक्षेत यश - नीट पीजी

दि नेशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पदव्युत्तर वैद्यकीय 'नीट पीजी' परीक्षेत जळकोटच्या डॉ. सुमित धुळशेट्ट याने देशात ६९ वा क्रमांक पटकावला आहे.

डॉ. सुमित धुळशेट्ट

By

Published : Feb 21, 2019, 4:58 PM IST

लातूर - 'दि नेशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन'च्या वतीने राष्ट्रीय पदव्युत्तर वैद्यकीय 'नीट पीजी' परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत जळकोटच्या डॉ. सुमित धुळशेट्ट याने देशात ६९ वा क्रमांक पटकावला आहे.

डॉ. सुमित धुळशेट्ट

मुंबई येथील केईएम महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणून या परीक्षेत सुमितने सहभाग घेतला होता. या परीक्षेसाठी तब्बल दीड लाखाहून अधिक परीक्षार्थी होते. यामध्ये त्याने ६९ वा क्रमांक पटकावला तर एम.पी.जी परीक्षेतही त्याने १०० वा रँक मिळवला आहे.

सुमितने १२ वी पर्यंतचे शिक्षण नांदेड येथील ग्यान माता विद्याविहार आणि यशवंत महाविद्यालयात पूर्ण केले आहे. तो मुंबई येथील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आहे. मूळचा जळकोट येथील रहिवासी असलेल्या सुमितने आतापर्यंत विविध स्कॉलरशीप आणि पदके मिळवली आहेत. त्याच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details