महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या श्रावणमास तपोष्टान कार्यक्रमास नेत्यांची मांदियाळी - अशोकराव चव्हाण

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या 83 व्या श्रावणमास तपोष्टान कार्यक्रमाची सांगता गुरुवारी उदागिरमध्ये झाली. यावेळी हजारो भाविक श्रद्धेपोटी तर राजकीय नेते स्वार्थापोटी व्यासपीठावर असल्याचे दिसून आले.

मांदियाळी

By

Published : Aug 22, 2019, 11:49 PM IST

लातूर - डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या 83 व्या श्रावणमास तपोष्टान कार्यक्रमाची सांगता गुरुवारी उदागिरमध्ये झाली. यावेळी हजारो भाविक श्रद्धेपोटी तर राजकीय नेते स्वार्थापोटी व्यासपीठावर असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमास पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते उपस्थित होते. तर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या कालावधीत झालेल्या कार्यक्रमांमुळे मराठवाड्यात पावसाची कृपा होईल असा आशावाद संयोजन समितीने व्यक्त केला आहे.

डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या श्रावणमास तपोष्टान कार्यक्रमास नेत्यांची मांदियाळी


उदगिरमध्ये गेल्या 21 दिवसांपासून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 83 वा श्रावनमास तपोष्टान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यानच्या कालावधीत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी मौन धारण केले होते. तपोष्टान कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल होती. शिवाय सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हातही देण्यात आला होता. आज गुरुवार अखेरच्या दिवशी शिवाचार्य महाराज यांनी मौन सोडले आणि हजारो भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले.


विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, शिवाय या महाराजांना मानणारा वर्ग उदगीर, अहमदपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. एवढेच नाहीतर मनोगत व्यक्त करताना अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित नेत्यांचा राजकीय स्वार्थ असल्याचे मान्यही केले. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शहरात जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details