निलंगा (लातूर) -लातूरच्या निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातले आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बुधवारी जारी केले आहेत.
आरबीआयने जारी केले आदेश -
निलंगा (लातूर) -लातूरच्या निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातले आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बुधवारी जारी केले आहेत.
आरबीआयने जारी केले आदेश -
राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाने निलंगा येथे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँक आहे. या बँकेकडे पुरेसा भांडवलाचा अभाव आणि भविष्यातील मिळकतीत बँकेकडून असणारी वाढीची शक्यता धूसर असल्या कारणास्तव 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने बुधवारी आदेश जारी केले. यात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय गुरुवार (15 जुलै) पासून सदरील बँकेला आगामी काळात कसलाही अर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे नमुद केले आहे.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती पाहता, तिच्याकडे सर्व ठेवी रक्कमही परत करता येणे शक्य नाही. असे 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने परवाना रद्द करीत असल्याच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे बुधवारची (14 जुलै) कामकाजाची वेळ संपल्यानंतर सदरील बँकेला ठेव स्वीकारणे अथवा परत करण्याला तसेच बँकेकडून कर्ज वितरण करण्यास मनाई करण्यात आल्याचे 'आरबीआय'ने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.