लातूर : जिल्ह्यात 6 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये लातूर, चाकूर आणि जळकोट तालुक्यात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहण्याचे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. सोमवारी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे कापूस जिनिंगच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवाय कापसाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे घाबरू नका मात्र, दक्षता बाळगा : पालकमंत्री अमित देशमुख - दक्षता बाळगा
लातूर जिल्ह्यात 6 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये लातूर, चाकूर आणि जळकोट तालुक्यात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहण्याचे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
सध्या देशातील नागरिक एका विशिष्ट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहोत. कोरोनाचे संकट जगासमोर आहे. मात्र, याला घाबरून न जाता आता अधिक दक्ष रहाणे गरजेचे झाले आहे. सध्या मुंबई- पुणे येथून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आल्याबरोबर त्यांनी घरी न जाता आरोग्य तपासणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात 4 हजार 314 शेतकरी कापूस उत्पादक आहेत. जळकोट, अहमदपूर या तालुक्यांत ही संख्या अधिक आहे. त्यामुळे कापसाला अधिकचा भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दिलासाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील, राजकिशोर मोदी यांची उपस्थिती होती. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यंदा बी- बियाणे आणि खतांची कमी पडू देणार नसल्याची हमी यावेळी पालकमंत्री यांनी दिली.