महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णांच्या सेवेसाठी 'डाॅक्टर्स आले आपल्या दारी'; भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ लागल्याने इतर आजार असलेल्या रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी ही डॉक्टर्स आले आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

doctors came at your home helps to rural patients
रुग्णांच्या सेवेसाठी 'डाॅक्टर्स आले आपल्या दारी';भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

By

Published : Apr 23, 2020, 9:49 AM IST

Updated : Apr 23, 2020, 1:01 PM IST

लातूर- कोरोना विषाणूचे संकट ओढावल्यापासून शासकीय तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या घटलेली आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 500 ते 600 ओपीडी ही नियमित असते पण गेल्या महिन्याभरापासून 80 ते 100 येऊन ठेपली आहे. जनतेची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय जैन संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'डाॅक्टर्स आले आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णांना होत आहे.

रुग्णांच्या सेवेसाठी 'डाॅक्टर्स आले आपल्या दारी'; भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ लागल्याने इतर आजार असलेल्या रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स आले आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बुधवारी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील गावागावात जाऊन या संघटनेच्या वतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी शिरूर अनंतपाळ शहरासह ग्रामीण भागातील 450 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सध्याच्या लाॅकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य बनले आहे. परिणामी नागरिकांना कान, नाक, घसा, मधुमेह यांसारख्या किरकोळ आजारांचा सामना करावा लागत आहे. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांच्या सुचनेनुसार सुनील कोचेटा, अभय शहा, बीजेएस जिल्हाध्यक्ष केयुरभाई कामदार यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्षा शोभाताई गायकवाड, अ‌ॅड.जयश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रामदास पवार, वैद्यकिय अधिकारी डाॅ.बालाजी देवंगरे, डाॅ.राजकुमार बोपलकर, नगरसेवक संतोष शेटे, गणेश धुमाळे, पाणीपुरवठा सभापती सुमीत दुरुगकर यांची उपस्थिती होती.

Last Updated : Apr 23, 2020, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details