महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Latur Doctor Online Fraud : लातूरात उच्च शिक्षित डॉक्टरला 'ऑनलाइन फ्रॉडचा' झटका; तीन लाख लंपास - Latur Doctor Online Fraud

मी इंडीयन आर्मीमध्ये अधिकारी असून आमच्या सैन्य दलातील जवानांची रक्त तपासणी करावयाची आहे, असे सांगत लातूर ( Online fraud news ) शहरातील एका उच्च शिक्षीत डॉक्टरला ( Doctor cheating Latur ) अनोळखी भामट्याने तब्बल 2 लाख 99 हजारांचा गंडा घातला आहे.

Latur Doctor Online Fraud
Latur Doctor Online Fraud

By

Published : May 30, 2022, 9:03 PM IST

लातूर -मी इंडीयन आर्मीमध्ये अधिकारी असून आमच्या सैन्य दलातील जवानांची रक्त तपासणी करावयाची आहे, असे सांगत लातूर शहरातील एका उच्च शिक्षीत डॉक्टरला अनोळखी भामट्याने तब्बल 2 लाख 99 हजारांचा गंडा घातला आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन वळविल्याची घटना लातूर शहरात समोर आली आहे. या संदर्भात शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांता गुन्हा दाखल -लातूर शहरातील आंबाजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका परिसरात हाळणीकर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. चंद्रकांत हाळणीकर यांना दोन दिवसांपूर्वी (दि.26 मे) एक फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने तो आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. त्यानंतर या भामट्याने आपले नाव नितेश कुंभार असल्याचे सांगत आम्हाला आमच्या दलातील 50 जवानांची रक्ततपासणी करावायाची असून यासाठी किती खर्च येईल, अशी विचारणा केली. या विषयावर डॉक्टरांना बोलते करत तपासणीचा खर्च थोड्या वेळात क्रेडिट कार्डने ऑनलाईन आपल्यास ट्रान्सफर करतो, असे सांगत आमच्या ऑफिसरसोबत तुम्ही व्हॉट्सअपवर बोला, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार व्हिडिओ कॉलवर फोन करुन बोलने सुरू असताना डॉक्टरांना दुसऱ्या मोबाईलरून प्रोसेस करायला सांगितले. बोलत-बोलत या भामट्याने डॉक्टरांकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून घेतली आणि त्यांच्या खात्यातील 2 लाख 99 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून घेतली. आपण फसवले गेलो असल्याची कल्पना येताच डॉ. चंद्रशेखर हाळणीकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांत गुरनं 245/22 कलम 420 भादंवि सहकलम 66 (सी), 66 (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅंकेचा तपशिल गुप्त ठेवा, पोलिसांचे प्रशासनाचे आवाहन -सध्या बऱ्याच डॉक्टरांना विविध संरक्षण दलातील जवान, अधिकारी असल्याची बतावणी करुन आम्हाला उपचारासाठी ॲडव्हान्स पेमेंट करायचे आहे, असे सांगून फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे असे फोन कॉल्स आल्याच आपण आपल्या खात्याची, एटीएम, क्रेडिट कार्ड संदर्भातली कोणतीही माहिती देऊ नये. सर्व डॉक्टर्स व रुग्णालयांनी ऑनलाइन व्यवहार करीत असताना खबरदारी व शहानिशा करूनच व्यवहार करावेत असे आवाहन लातूर पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहेत.

हेही वाचा -ED arrests Delhi Health Minister : दिल्लीमधील आप सरकारला धक्का, ईडीकडून आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details