लातूर -महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज काँग्रेस-भाजपच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या स्थायी समितीच्या सदस्य पदावरून हा गोंधळ सुरू झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की काही नगरसेवकांनी थेट टेबलवर चढून संताप व्यक्त केला, तर काहींनी बाटल्याही फोडल्या.
लातूर मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत राडा; काँग्रेस-भाजपचे नगरसेवक आमने-सामने - लातूर मनपा राडा
चार महिन्यांपूर्वी लातूर महानगरपालिकेत सत्तांतर झाले आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान ही मनपा भाजपच्या ताब्यातून काँग्रेसकडे गेली आहे. सध्याचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार हे पूर्वी भाजपमध्ये होते. ऐन निवडीच्या दिवशी त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याने हा बदल झाला आहे.

दरम्यान, बिराजदार हे स्थायी समितीचे सदस्य होते. आठ महिन्यापूर्वी त्यांनी माजी महापौर सुरेश पवार यांच्याकडे या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तो राजीनामा कुण्या सभेत दिला नसल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तो नामंजूर केला. त्यामुळे चंद्रकांत बिराजदार हे आजच्या स्थायी समितीच्या बैठकीस उपस्थित राहिले होते. मात्र, सभापती दिपक मठपती यांना उपमहापौर म्हणून तुम्हाला बैठकीत उपस्थित राहता येईल. मात्र, हस्तक्षेप करता येणार नसल्याचे सांगितले. शिवाय भाजपच्या इतर नगरसेवकांनीही त्यांना विरोध केला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली. वाद निर्माण होताच सभापती यांनी राष्ट्रगीतास सुरुवात केली. मात्र, राष्ट्रगीत संपताच पुन्हा वाद सुरू झाला आणि नगरसेवकांनी कागदपत्रे फाडली, तर बाटल्या फोडल्याचा प्रकार आजच्या बैठकीत झाला आहे.