लातूर - जिल्ह्याच्या शिरुर अनंतपाळ तालूक्यातील बिबराळ येथील एका महा ई-सेवा केंद्र चालकाने पीकविम्याच्या रकमेत अफरातफर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलीस व तहसील प्रशासनासह कृषी विभागाकडे धाव घेतली आहे. महा ई-सेवा केंद्र चालकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांच्याकडे केली आहे.
लातूर : पीक विमा भरताना महा ई-सेवा केंद्र चालकाकडून फसवणुकीचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांनुसार, बिबराळ येथील एका महा ई-सेवा केंद्रातून बिबराळ व बाकली या दोन गावातील जवळपास 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम भरणा केली आणि भरलेल्या रकमेची पावतीही घेतली. परंतू दोन महिन्याच्या कालावधीनंतर भरलेली रक्कम व ऑनलाइन ॲपद्वारे दाखवत असलेली रक्कम यात मोठी तफावत दिसून आल्याचे शेतकरी म्हणाले.
याविषयी शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांनुसार, बिबराळ येथील एका महा ई-सेवा केंद्रातून बिबराळ व बाकली या दोन गावातील जवळपास 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम भरणा केली आणि भरलेल्या रकमेची पावतीही घेतली. परंतू दोन महिन्याच्या कालावधीनंतर भरलेली रक्कम व ऑनलाइन ॲपद्वारे दाखवत असलेली रक्कम यात मोठी तफावत दिसून आल्याचे शेतकरी म्हणाले. महा-ई-सेवा केंद्र चालकाने विम्याची पूर्ण रक्कम भरली नसून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले असे शेतकरी म्हणाले. भविष्यात पीकविमा मंजूर झाला तर होणाऱ्या लाभापासून आपण वंचित राहू. यासाठी केंद्र चालक जबाबदार असून त्याची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा सामूहिक उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, महा ई-सेवा केंद्राचा चालक आता फरार झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांनी दिले आहे. शिवाय पोलीस निरीक्षक अंगद सुडके यांनी या प्रकरणी चौकशी करुनच त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती दिली आहे.
हेही वाचा -कन्नमवार नगरचा पुनर्विकास होऊ दे रे महाराजा...; अनोखा देखावा करून बाप्पासमोर गाऱ्हाणं