लातूर - नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत एक अनोखा विक्रम धीरज देशमुख यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.
धीरज देशमुख यांचा अनोखा विक्रम, निवडणुकीच्या इतिहासात 'असे' पहिल्यांदाच घडले!!
ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी चक्क नोटाचा पराभव केल्याची घटना भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.
धीरज देशमुख यांना एकूण १, ३५,००६ इतकी मते मिळाली. या निवडणूकीत त्यांच्या विरोधात भाजप शिवसेनेच्या युतीचा उमेद्वार उभा होता. मात्र धीरज यांनी महायुतीच्या उमेद्वाराचा पराभव केला नाही, तर नोटाचा पराभव केल्याची घटना भारतात पहिल्यांदाच घडली आहे. नोटाला २७,५०० मते मिळाली आणि महायुतीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.
विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांनी लातूरमधून बाजी मारली आहे. लातूर शहरातून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख विजयी झाले. अभिनेता रितेश देशमुखने दोन्ही भावांच्या प्रचारात जोरदार भाषणे केली होती. धीरज देशमुख यांनी केलेल्या नोटाच्या पराभवाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.