लातूर- राजे गेले तरी मावळे बरोबर आहेत. मात्र दुःख एवढेच आहे की ज्या आण्णाजी पंतांनी छत्रपतींच्या घरात भांडणे लावली. त्याच पंताला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शरण गेले आहेत, असे म्हणत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली.
राजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधानांऐवजी कोण आले? धनंजय मुंडेंच्या 'या' प्रश्नाला जनतेने दिले असे उत्तर - udayanraje bhosale in BJP
उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला पंतप्रधान येणार होते. मात्र त्यांच्या सभेला आले कोण, असा सवाल त्यांनी सभेतील लोकांना विचारला. त्यावेळी लोकांनी चोर...चोर म्हणत अप्रत्यक्षरित्या अमित शाह यांच्यावरील रोष दर्शवला.

धनंजय मुंडे
राजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधानांऐवजी आले कोण?
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, महाराजांची गादी मुख्यमंत्र्यांच्याही गादीपेक्षा मोठी आहे. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला पंतप्रधान येणार होते. मात्र त्यांच्या सभेला आले कोण? असा सवाल त्यांनी सभेतील लोकांना विचारला. त्यावेळी लोकांनी चोर...चोर म्हणत अप्रत्यक्षरित्या अमित शाह यांच्यावरील रोष दर्शवला.