लातूर -आम्ही बोलायला लागलो तर सर्व काही बाहेर काढू, आम्हाला ईडीची भीती दाखवू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी भाजपला दिला. ते आज (बुधवारी) लातूरमधील कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.
ईडी-पिडीची भीती आम्हाला दाखवू नका - धनंजय मुंडे - धनंजय मुंडे
शरद पवारांवर टीका कराल तर या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत भाजपला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे
हेही वाचा -राणा पाटलांचा भाजप प्रवेश पत्नी प्रेमापोटी - धनंजय मुंडेंची खोचक टीका
अमित शाह यांनी पवारांनी राज्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच आम्ही पक्षाचे सर्व दरवाजे उघडले तर राष्ट्रवादीमध्ये केवळ शरद पवार हेच राहतील, असे म्हटले होते. या टीकेला उत्तर देताना मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन आमची इज्जत काढाल, शरद पवारांवर टीका कराल तर या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत भाजपला गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे वक्तव्य केले.