महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2020, 7:33 PM IST

ETV Bharat / state

गाव डोंगरगाव पण भ्रष्टाचाराने पोखरलेले; ग्रामस्थांचे आमरण उपोषण

निलंगा तालुक्यातील डोंगरागावत मूलभूत सोई-सुविधांकडे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांचे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. गावातील रस्ते पक्के करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. शिवाय अपंग कल्याण निधीमार्फत अनेकांना महिन्याकाठी पगारी करणे बंधनकारक आहे.

ग्रामस्थांचे आमरण उपोषण
ग्रामस्थांचे आमरण उपोषण

लातूर - ग्रामीण भागात मूलभूत सोई-सुविधा मिळाव्यात म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून एक ना अनेक योजना आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आणि ग्रामसेवकांचा मनमानी कारभार यामुळे गावे विकासापासून वंचित राहत आहेत. निलंगा तालुक्यातील डोंगरगाव (हा) येथेही ग्रामसेवक किशोर रेड्डी यांच्या मनमानी कारभारामुळे विकास कामे रखडली आहेत तर अपंगांना योजनांचा लाभ मिळत नाही, त्यामुळे कारवाईच्या ग्रामस्थांनी 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर रोजी उपोषणही केले होते. मात्र, निलंगा गटविकास अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

गाव डोंगरगाव पण भ्रष्टाचाराने पोखरलेले; ग्रामस्थांचे आमरण उपोषण

निलंगा तालुक्यातील डोंगरागावत मूलभूत सोई-सुविधांकडे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांचे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. गावातील रस्ते पक्के करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. शिवाय अपंग कल्याण निधीमार्फत अनेकांना महिन्याकाठी पगारी करणे बंधनकारक आहे. मात्र ग्रामसेवक किशोर रेड्डी आणि सरपंच उषाबाई हजारे यांच्या मनमानी कारभारामुळे विकास कामे तर रखडली आहेतच शिवाय अनेकांना योजनांचा लाभही मिळत नाही. रोहियो अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. शौचालये मंजूर झाली आहेत परंतु निम्याहून अधिक शौचालये ही अपूर्णच आहेत या ग्रामपंचायतीच्या कारभाराला त्रासून ग्रामस्थांनी 2 ऑक्टोबर रोजीच उपोषण केले होते. मात्र, गावात येऊन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी करावी आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -लातुरात ब्लू पँथरचे अर्धनग्न आंदोलन; हाथरसच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details