महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर शहर उमेदवारीवरून देशमुख-निलंगेकरांमध्ये रंगला कलगीतुरा - maharashtra assembly election 2019

माझ्या विरूद्ध विरोधकांकडे उमेदवारच नसल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले होते. पालकमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही देऊ तो उमेदवार सर्वसामान्यात मिसळणारा असेल. तो जनतेत अंतर ठेवून राहाणारा नसल्याचे सांगत संभाजी पाटलांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. यावरून आता विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.

लातूर शहर उमेदवारीवरून देशमुख-निलंगेकरांत रंगला कलगीतुरा

By

Published : Sep 26, 2019, 2:00 PM IST

लातूर - जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी लातूर शहर विधानसभेची जागा केंद्रस्थानी आहे. या मतदारसंघात आमदार अमित देशमुखांनी प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अद्यापपर्यंत युतीच्या उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे माझ्या विरूद्ध विरोधकांकडे उमेदवारच नसल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले होते. पालकमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही देऊ तो उमेदवार सर्वसामान्यात मिसळणारा असेल. तो जनतेत अंतर ठेवून राहाणारा नसल्याचे सांगत संभाजी पाटलांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. यावरून आता विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.

सातारा लोसकभा पोटनिवडणूक: उदयनराजेंच्या गडाला राष्ट्रवादी देणार का हादरा?

लातूर शहर मतदारसंघातून आमदार अमित देशमुख यांनी महिन्याभरापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील २७ गावांमध्ये त्यांच्या प्रचारफेऱ्याही झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार आणि प्रचार यंत्रणा कामाला लागली असताना भाजपकडून उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. गतवेळचे भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी, अजित कव्हेकर, प्रेरणा होनराव, डॉ. मन्मथ भातंबरे, मनोहर पटवारी यांची नावे चर्चेत असताना पालकमंत्र्यांनी मोठा माणुसच आमदार व्हावा असे नाही. सर्व सामान्य कार्यकर्ताही आमदार होऊ शकतो म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांना एक प्रकाराचा इशाराच दिला आहे. तर दुसरीकडे अमित देशमुख हे जनतेशी अंतर ठेऊन वागतात. सर्वसामान्यांमध्ये मिसळत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे लातूर शहरबाबत देशमुख यांना आत्मविश्वास आहे की अति-आत्मविश्वास याबाबत चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून योग्य उमेदवाराची चाचपणी केली जात आहे.

माझी लढाई व्यक्तीशी नाही, तर प्रवृत्तीशी - पंकजा मुंडे

शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाई विरोधात बीडमध्ये निदर्शने

ABOUT THE AUTHOR

...view details