लातूर - तालुक्यात सद्या हिवताप, मलेरिया, डेंग्यू या रोगाची लागण झाली आहे. यात आता तालुक्यातील तिसऱ्या चिमुकल्याचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे आजारी असलेल्या लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील औराद शहाजनी येथे आठवड्यापूर्वी एकाचा बळी गेला होता. आता देवणी तालुक्यातील हिसामनगर व वलांडी येथेही दोन घटना ताज्या असतानाच बुधवारी सकाळी वलांडी येथील दर्शन केशव कारले (वय.१२) चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण झाले आहे.
हिसामनगर येथील शहाजान दस्तगीर शेख, तर वलांडी येथील नाजीया जलील पटेल यांचा या आठवड्यात मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापुर्वी वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले होते.त्यावेळी दोन दिवस पथक भेट देवुन पहाणी केली पण उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप सरपंच विजयकुमार मुके व वलांडीचे सरपंच प्रा.महेमुद सौदागर यांनी वेळोवेळी केला आहे. अबेटींग फवारणीही अर्धवटच आहे. केवळ पाणीसाठे, नाल्याची पहाणी करुन गावातील आजारी असलेल्या व्यक्तीची माहिती घेतली. मात्र, प्रशासनाकडुन ठोस उपाययोजना न झाल्याचा रोष ग्रामस्थातुन व्यक्त होत आहे. शिवाय दवाखान्यात किट किंवा अबेंटीग संपले असल्याने नागरिकांना खाजगी दवाखाने गाठावा लागतो आहे.
हा रोग घरात डास अळी झाल्यास उदभवतो. केलेल्या पाहणीत प्रत्येक घरात डास अळ्या आहेत. शिवाय गावात असलेल्या निकामी टायरमुळे याचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तीव्र ताप, अंगदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहान तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप गुरमे यांनी केले आहे.
पथक मुक्कामी तैनात -