महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आभाळ फाटलंय; मदतीशिवाय पर्याय नाही.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा

निलंगा तालुक्यातील अनेक गावात पिकांचे तर नुकसान झालेच आहे, पण शिवारातील मातीही वाहून गेली आहे. विशेषतः सोयाबीनच्या गंजी अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आभाळ फाटलंय
आभाळ फाटलंय

By

Published : Oct 18, 2020, 2:30 PM IST

लातूर- जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व काही हिसकावून घेतले आहे. या नुकसानीनंतर जिल्ह्यात आमदार, खासदार यांची पीक पाहणीसाठी रीघ लागली आहे. पावसाने खरिपाच मोठे नुकसान झाले आहे. आभाळ फाटल्यागत पाऊस झाला असून आता सरकारनेच मदतीचा हात देऊन या संकटातून बाहेर काढण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

आभाळ फाटलंय; मदतीशिवाय पर्याय नाही.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा
निलंगा तालुक्यातील अनेक गावात पिकांचे तर नुकसान झालेच आहे. पण शिवारातील मातीही वाहून गेली आहे. विशेषतः सोयाबीनच्या गंजी अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पीक पाहणीचा दौरा होत आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत या 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेतल्या आहेत.

हेही वाचा -मराठवाड्यात अतिवृष्टी : देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर

निलंगा तालुक्यातील सावरी, सोनखेड, मानेजवळगा, तागडखेडा, औराद, चांदुरी या शिवारातील पिकांचे तर नुकसान तर झालेच आहे. पण पाणी साचल्याने भविष्यात रब्बी हंगामातही उत्पादन घेता येईल का नाही, अशी अवस्था झाली आहे. मंत्री गावात येणार म्हटल्यावर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने त्यांची वाट पाहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details